लातूर जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता , परंतु हरियाणा वरुन आंध्रप्रदेशात जाणारे काही प्रवासी निलंगा येथे सापडले . त्यातील 8 जण covid-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .ते लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत . परंतु दुर्दैव एवढेच की या दवाखान्यात पी. पी. ई. किट (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट ) उपलब्ध नाहीत . शासनाकडून कोरोना उपचारासाठी मदतीचा ओघ सुरू आहे ,या खर्चातून साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी 'फेसबुक लाइव्ह' वर बोलताना व्यक्त केले आहे .
https://www.facebook.com/SambhajiPatilBJP/videos/1382158175305514/
आमदार पाटील यांनी सरकारला खडेबोल सुनावताना सांगितले की आम्ही आमचा निधी दिला तरी किट मिळत नाहीत . आता आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यावर त्यांच्या उपचारासाठी डॉक्टर त्यांना सामोरे कसे जाणार ? राज्य शासनाने याची त्वरित दखल घ्यावी व किट उपलब्ध करून द्यावेत , अशी त्यांनी मागणी केली . कोरोना सोबत लढण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी आपल्या परीने सर्व तो कार्य सुरू केले आहे. नागरिकांनीही सर्वथा सहकार्य करावे , ही आपली सामूहिक जबाबदारी आहे . या संकटातून आपण नक्कीच बाहेर येऊ, असेही आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले .