आ. रोहितदादा पवार यांच्याकडून उस्मानाबादमध्ये ६०० लिटर सॅनिटायझरचे वाटप...

उस्मानाबाद, दि.८- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मा.श्री.रोहितदादा पवार यांच्या बारामती ऍग्रो प्रा.लि.च्या वतीने कोरोना या भयावह रोगाचे गांभीर्य लक्षात घेता उपाययोजना म्हणून व या संकटावर मात करण्याच्या दृष्टीकोनातुन उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयास ६०० लिटर सॅनिटायझर मोफत देण्यात आले.
युवा आमदार तसेच युवा उद्योजक असणारे श्री.रोहित दादा पवार यांची समाजाप्रती असणारी तळमळ यातून दिसून येते. मागील काही दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळुन आल्यामुळे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री.सुरेश दाजी बिराजदार यांना संपर्क करून जिल्ह्यातील उपाययोजना संबंधात योग्य ती मदत पुरवतो म्हणून आ.रोहितदादा पवार यांनी अश्वस्त केले होते. ते आज त्यांनी पूर्ण केले. याचे आज जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे व कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्हाधिकारी सौ.दीपा मुधोळ-मुंडे मॅडम यांच्याकडे व जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राजतीलक रोशन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणताई सलगर, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल,नगरसेवक प्रदीप मुंडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य शंतनु खंदारे,राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश सचिव धीरज घुटे, डॉ. सुरज मोटे,प्रवीण तांबे, सचिन तावडे, रणधीर इंगळे,शेखर घोडके आदी पदाधिकारी व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.



Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image