वाशी- आज वाशी शहर व तालुका कोरोनाशी लढा देणाऱ्या महसुल अधिकारी पोलीस अधिकार आरोग्य विभागातील कर्तव्य बजावत असणाऱ्या कर्मचार्यांना तसेच 500 गरजु लोकांना श्री.प्रशांत बाबा कवडे प्रदेश सरचिटणिस राष्ट्रवादी युवक काँग्रेस. यांच्या तर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
समाजिक बांधिलकी जपत व सोशल डीस्टन्सिंग लक्षात घेऊन ज्या ठीकाणी कर्मचारी ड्युटीवर असतील त्यांना तिथे जाऊन व ज्या लोकांना गरज आहे अशा सर्वांना त्या ठिकाणी जाऊन जेवण देण्याच नियोजन करण्यात आल आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अभिजीत जगताप, युवानेते तथा मराठवाडा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज ढेपे, श्री. निवांत कवडे आदि उपस्थित होते..