लातूर - लातूर जिल्ह्यात अद्याप पर्यंत तरी एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नसल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले असून , पुढील काळात घराचे बाहेर कोणीही पडू नये , विनाकारण बाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल तसेच गरज पडल्यास आर्मी ला बोलावले जाईल .
ज्या दानशूर व्यक्ती व संस्थांना मदत करावयाची आहे त्यांनी परस्पर नागरिकांना देऊ नयेत , जी काही मदत जनतेला करावयाची आहे ती मदत आमच्याकडे जमा करावी , कारण आपल्या जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातील तीन हजार नागरिक संभाळण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे, तसेच जिल्ह्यातील सर्वच कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून तीन महिन्याचे धान्य एकदाच वाटप केले जाणार आहे. रेशन कार्ड पाहिले जाणार नसून त्यांची यादी बनवून त्या सर्व घटकातील नागरिकांना धान्य वाटप केले जाणार आहे . तसेच किराणा दुकान पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येतील व सुपर मार्केट यांना यातून वगळण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर दिल्यास कार्यवाही करण्यात येईल येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले