राज्यभर कोरोना ग्रस्तांचा वाढता आकडा पाहता विविध सामाजिक संस्था मदतीला पुढे येत आहेत . डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहाय्याने गावकऱ्यांना सोबत घेऊन प्रवरानगर लोणी येथे अवघ्या सहा दिवसात अत्यंत सुसज्ज असे कोरोना रुग्णालय उभारले आहे .
डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या 'प्रवरा मेडिकल ट्रस्ट' द्वारे कोरोना च्या पुढील संकटाची गरज ओळखून उभारलेल्या , या रुग्णालयाला 'covid-19 रुग्णालय ' असे नाव देण्यात आले आहे. यासाठी लागणारे डॉक्टर , नर्स , इतर स्टाफ यांना लगेच ट्रेनिंग दिले गेले . आवश्यक असणारी सर्व साधने यांची उपलब्धताही तात्काळ केली आहे .
रुग्णालय उभारण्यासाठी विविध समाज घटकांना मदत करण्याचे आवाहन केले होते . एका दिवसात वीस लाख रुपयांची मदत समोर आली आणि पुढे अशी मदत येत राहिली . केवळ चार दिवसातच आय.सी.यू. ,विलगीकरण कक्षांसह 100 खाटांचे काम पूर्ण झाले .
सहकार ,शिक्षण ,कृषी यासह आता आरोग्य क्षेत्रातही प्रवरा पॅटर्न महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल . हे विशेष covid-19 रुग्णालय अकोले, संगमनेर ,श्रीरामपूर ,कोपरगाव ,राहुरी ,राहता ,शिर्डी, नेवासा ,सिन्नर व येवला येथील नागरिकांसाठी 'लाईफ लाईन' ठरू शकते .डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या कार्याचा इतर पुढाऱ्यांनी ही आदर्श घ्यावा .