लातूर- सर्व जगाला विळखा घातलेल्या कोरोनाशी लढा देणार्या कोरोना वॉरिअर्स आणि लातूर शहरातील स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथील रुग्णांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे म्हणून लातूर येथील सेवा भावी संस्था रयत प्रतिष्ठान आणि नगर सेविका सौ. शोभाताई पाटील यांच्या वतीने आर. ओ. वॉटर प्युरिफायरचे दोन संच भेट देण्यात आले आहेत.यावेळी सोशियल डिस्टन्सींगचेही काटेकोरपणे पालन करण्यात आले.
समाजोपयोगी आणि मानव हितार्थ सेवेसाठी कार्यरत असणार्या लातूर येथील रयत प्रतिष्ठान ही सेवाभावी संस्था मागच्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. त्याचबरोबर आपल्या राजकिय कार्याबरोबरच समाजहित जोपासणार्या लातूरच्या प्रभाग क्र. 17 च्या नगरसेविका सौ. शोभाताई पाटील यांचीही सर्वत्र निरपेक्ष भावाने सेवा कार्यासाठी प्रसिध्दी आहे. सध्या संपूर्ण जगाबरोबर लातूरसह परिसरात प्रत्येक जण कोरोना विळख्यात अडकला आहे. अशा वेळी लातूरच्या शासकीय रुग्णालयात अविरत सेवेत असणार्या कोरोना वॉरिअर्सना त्यांच्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विविध उपाय योजन्याची आवश्यकता आहे. अशातच या परिसरात सर्वांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे या प्रामाणिक आणि सेवाभावी उद्देशातून कोरोना वॉरिअर्स बरोबरच येथील सर्वच रुग्णांना पिण्यासाठी आर. ओ. चे प्युरिफायरर्ड पाणी पिण्यासाठी मिळावे आणि वरील सर्वांना अधिक स्वास्थ्य लाभावे या प्रमाणिक उद्देशाने लातूर येथील रयत प्रतिष्ठान आणि नगर सेविका सौ.शोभाताई पाटील यांच्या वतीने आर. ओ. वॉटर प्युरिफायरचे दोन संच भेट देण्यात आले आहेत. या प्रसंगी रयत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास काळे, लातूर कपडा बँकेचे सचिव व रयत प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुनिलकुमार डोपे, नगर सेविका सौ. शोभाताई पाटील, रयत प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सूर्यकांत लोखंडे, अमोल जोशी, प्रा. रावसाहेब पाटील, कृष्णा सोनी आदींची उपस्थिती होती.
या दरम्यान लातूरच्या स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे सर यांनी आर.ओ. वॉटर प्युरिफायरचे संच उपलब्ध करुन देणार्या रयत प्रतिष्ठान, लातूर आणि नगर सेविका शोभाताई पाटील व अन्य सहकार्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी सर्वांना सोशियल डिस्टन्सींगचे पालन करण्या बरोबरच कोरोनाच्या विषाणूच्या प्रकोपाबद्दल विस्तृत माहिती दिली.