मंबई | काही जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी उद्योगधंदे सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान याबाबतची माहिती दिली.
कोरोनाच्या संकटातून बाहेर येताना आर्थिक संकट नको. हे रुतलेले अर्थचक्र फिरवायचे आहे. त्यामुळे काही निवडक ठिकाणी आम्ही माफक स्वरूपात उद्योगांना परवानगी देत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
काही जिल्हे शून्य रुग्णाचे आहेत. काही ठिकाणी घट झाली आहे. रेड झोन, ऑरेंज , ग्रीन असे झोंन केले आहेत. त्यामुळे अशा काही निवडक ठिकाणी आम्ही माफक स्वरूपात उद्योगांना परवानगी देत आहोत. जर तुम्ही तुमच्या मजुरांची काळजी घेत असला, त्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था करीत असाल तर मान्यता मिळेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
येत्या 20 एप्रिलनंतर काही प्रमामात शिथिलता आणत असलो तरी जिल्ह्याच्या सीमा अजूनही खुल्या केलेल्या नाहीत. जिल्हा ओलांडून यायला परवानगी दिलेली नाही. किमान 3 मे पर्यंत हे बंधन आहे. मला अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू, माल यांची वाहतूक करायची आहे. व्हायरसची वाहतूक करायची नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.