लातूर,दि.१७ः पर्यावरण प्रेमी शरद झरे यांच्या माणूस प्रतिष्ठानच्या वतीने वानटाकळी ता.अंबाजोगाई येथे दान मिळालेल्या सहा एक जागेवर उभारण्यात येणार्या झाडांचे जंगल आणि अनाथ,भटक्या विमुक्त बालकांचे कुटूंब निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवार, दि.१४ एप्रिल २०२० रोजी सकाळी छ.शिवराय आणि डॉ.भीमराय यांच्या प्रतिमेचे बंजारा समाजातील ज्येष्ठ पारुबाई जाधव यांच्या हस्ते पूजन,वृक्षारोपण करुन करण्यात आला.
पृथ्वीचे प्रचंड वेगाने वाढणारे,पर्यावरणाचे असंंतुलन,वृक्षारोपण आणि एक लाख शालेय बालमित्र जोडण्याच्या उद्देशाने दि.१९ फेबु्रवारी पासून ५ हजार किलोमीटरच्या शिवराय ते भीमराय (दि.१९ फेबु्र. ते दि.१४ एप्रिल २०२०)जनजागरण सायकल यात्रेवर निघालेल्या शरद झरे यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊ्न झाल्याने २५६० किलोमीटर अशा अर्ध्यावरच सायकल यात्रा थांबवून पुणे गाठले.
तिथून विविध ठिकाणी अडकून पडलेल्या काही नागरिक, मजूर, असंघटीत,उसतोड कामगारांना मदतीचा हात देत आहेत.ते पुणे बाहेर जावू शकत नसल्याने त्यांंनी स्थापन केलेल्या माणूस प्रतिष्ठाणच्यावतीने ईकडे वानटाकळी ता.अंबाजोगाई येथील उभारण्यात येणार्या नियोजित झाडांचे जंगल आणि अनाथ, भटक्या विमुक्त बालकांचे कुटूंब निर्मिती प्रकल्पाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी दि.१४ एप्रिल रोजी या प्रकल्पाला जमीन दान देणार्या बंजारा समाजातील दानशूर याडी पारूबाई गणपत जाधव व प्रतिष्ठानणचा कोषाध्यक्ष कृष्णा राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपणाने शुभारंभ करण्यात आला.
शरद झरे यांनी पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी जंगल निर्मितकरणे, जनजागरण करणे सोबतच विमुक्त भटक्यां,अनाथ मुलांचा शोध घेवून त्यांच्यातील कलागुणांना राज्य,देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाव देण्याचा निर्धार करुन महापुरुषांंचे विचार शिरसावंद्य मानून कामाला लागले आहेत,त्यांच्या या कार्याबद्दल प्राचार्य डॉ.मधुकर मुंडे,लक्ष्मणराव वंगे,सुभाष निंबाळकर, व्यंकटराव पनाळे,प्रा. एम.बी.पठाण, महादेव राऊत, अनिल तोंडचिरकर, व्यंकट पोतदार, राहूल गायकवाड,मंगल बारसकर, राधा कोरके,सुनील गुरनाळे, रामकुमार रायवाडीकर वैद्यराज तुकाराम रोकडे,आदिंनी अभिनंदन केले आहे.
वानटाकळीच्या डोंंगरपायथ्याला झाडांचे जंगल आणि अनाथ,भटक्या विमुक्त बालकांचे कुटूंब निर्मिती प्रकल्पाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी वृक्षारोपणाने शुभारंभ.