मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिट सर्व देशवायीयांना घरातील दिवे बंद करण्याचं आवाहन केल आहे. मात्र सर्व लाईट्स बंद केल्या तर राज्याच्या वीज निर्मिती प्रकियेला अडथळा येण्याची शक्यता आहे. अशातच मोदींच्या या मोहिमेला महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्सने विरोध दर्शवला आहे.
सध्या आपल्या महाराष्ट्राची विजेची डीमांड 32,000 मेगावॅट इतकी आहे. पण लॉकडाऊन असल्यामुळे महाराष्ट्रात इंडस्ट्रीअल पॉवर सप्लाय बंद असून फक्त घरगुती वापरासाठी वीजेचा वापर होत आहे. त्यामुळे आपल्याला 16,000 वॅट इतक्या विजेची आवश्यकता आहे.
मोदींनी केलेल्या आवाहनानुसार सर्व विजेचे दिवे एकाच वेळी बंद केल्या ग्रीड हाय फ्रीक्वेन्सीवर फेल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व वीजनिर्मिती संच बंद होतील. वीजेचा एक संच चालू होण्यासाठी 16 तास लागतात. त्यामुळे मल्टीस्टेट फेल्युअर होण्यचीही शक्यता आहे.
दरम्यान, या वीज बंद केल्याचा परिणाम अत्यावश्यक सेवा पुरवल्या जातात तिथं याचा फटका बसेल. हॉस्पिटलमधील वीजही जावू शकते. नरेंद्र मोदींनी या निर्णयावर पुन्रविचार करावा अशी मागणी, महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्सने केली आहे.