मुंबई | कोरोनाने सध्या भारतासह सर्व जगभरात हैदोस घातला आहे. कोरोनाच्या लढाईविरूद्ध विजय संपादन करण्यासाठी अनेक बॉलिवुड कलाकार पुढे सरसावत आहेत. अशातच अभिनेता खिलाडी अक्षय कुमारने मुंबई महापालिकेसाठी 3 कोटींची मदत केली आहे.
अक्षय कुमारने याआधी पंतप्रधान मदतनिधीला 25 कोटी रुपयांची मदत केली होती आणि आता सामाजिक भान जपत आणखीन मुंबई महापालिकेसाठी 3 कोटींची मदत केली आहे. त्यासोबत अक्षयने ही मदत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित मास्क मिळावा आणि टेस्टिंग किट्ससाठी मदत केली असल्याची माहिती आहे.
कोरोना विषाणूला हरवण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत आहे. अशा कठीण प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटीही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहेत.