कोरोना रुग्णाच्या चाचण्या व उपचार निशुल्क करण्याचा निर्णय आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केला .
कोरोना ची तपासणी करण्यासाठी आज खर्चिक पद्धती आहे . सामान्य नागरिकांना या महागाईच्या काळात त्रास होऊ नये ,जनतेला ला कसलीही आर्थिक झळ बसू नये म्हणून राज्यातील सर्व कोरोनाग्रस्त नागरिकांची तपासणी व उपचार मोफत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नेटवरून माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारने राज्यात प्लाजमा थेरपी सुरु करण्यास परवानगी दिली .
मुंबई ,पुणे, नागपूर, सोलापूर आदी जिल्ह्यात सदर प्लाझमा थेरपी चालू करण्याच्या शासन विचाराधीन असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.