यावर्षी सरासरीच्या शंभर टक्के पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज...

मुंबई - आयएमडीने यंदाच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


IMD ने पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. मान्सून यंदा सरासरी 100 टक्के होईल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. जरी हा पहिला अंदाज असला तरी त्यामध्ये बदल होऊ शकतो, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.


मान्सून 1 जूनच्या आसपास केरळच्या तिरुअनंतपूरममधून आगमन करेल, असाही अंदाज IMD ने वर्तवला. मात्र यामध्ये 3 ते 7 दिवस पुढे-मागे होऊ शकतात, असेही संकेत आहेत.



दक्षिण पश्चिम मान्सून जून ते सप्टेंबर या चार महिन्यात बरसतो. केरळमधून मान्सूनला सुरुवात होऊन, पुढे तो देशभर पसरतो. आयएमडीच्या या अंदाजाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image