कोरोना विरोधात लढा देणाऱ्या सरकारला समाजातील विविध स्तरांतून दानशूर लोक ,संस्था मदत करीत आहेत.परभणीच्या राजीव गांधी कृषी महाविद्यालयातील 2013 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ,व्हॉट्सऍप च्या माध्यमातून आपली आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी जमा केली .
राजीव गांधी कृषी महाविद्यालयातील 2013 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सऍप ग्रुप आहे. केवळ वायफळ गप्पा मारण्या पुरताच ग्रुपचा वापर न करता , हे विद्यार्थीमित्र वेळोवेळी एकमेकांना मदत करतात. या वेळी देखील सामाजिक दायित्व समजून या मित्रांनी आपल्या परीने जमेल तशी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले, सर्व सदस्य मित्रांनी या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला आणि ऑनलाईन माध्यमातून 5555 रुपये जमा केले.
सरकार या कोरोना महामारी युद्धाला सामोरे जात असताना जबाबदार नागरिकाचे कर्तव्य जाणुन ,विद्यार्थ्यांनी आपला खारीचा वाटा उचलत ही 5555 रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्त केली.
याद्वारे या विद्यार्थी मित्रांचे सामाजिक भान तर दिसून येतेच याबरोबरच त्यांची दृढ एकता ही जाणवते. त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.