लंडन - जगभरात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हा आकडा आता 22 लाखाहून अधिक झाला आहे. यात जवळपास 1 लाख 54 हजार लोकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे.
ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांनी कोरोना लस बनवल्याचा दावा केला आहे. आपल्या टीमने कोविड 19 म्हणजेच कोरोनावरील लस शोधल्याचा दावा ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीचे प्राध्यापक सारा गिल्बर्ट यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार सप्टेंबरपर्यंत कोरोनावरील लशीचे 10 लाख डोस उपलब्ध होतील.
आमची टीम अशा आजारावर संशोधन करत होती जो आजार महामारीचं रुप धारण करु शकतो. ही औषधाचं 12 वेळा परीक्षण करण्यात आलं आहे. औषधाचा रोग प्रतिकारक शक्तीवर चांगला परिणाम दिसून आला आहे. याची वैद्यकीय चाचणी देखील सुरु झाली आहे, असं सारा गिल्बर्ट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या लसबाबत ऑक्सफोर्ड टीमला इतका विश्वास आहे की वैद्यकीय अहवाल येण्याआधीच त्यांनी याचं उत्पादन देखील सुरु केलं आहे.