मुंबई | मला खोकला आणि नंतर ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मंगळवारी 7 एप्रिल मुंबईतील जे. जे. रुग्णालयात कोरोना टेस्ट करून घेतली आहे. माझी टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
आणखी चार दिवस घरुन काम पाहणार आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कार्यालयातून काम पाहता येईल. वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्याने कार्यरत असताना आपल्याला लागण झाल्यास इतरांना प्रादुर्भाव होऊ नये. त्याचप्रमाणे कुटुंबियांनाही याचा त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने मी ही चाचणी करून घेतली असल्याचं देशमुख यांनी सांगितलं आहे.
कोरोना सदृष काही लक्षणांमुळे डॉक्टरांनी खबरदारी म्हणून चाचणी करायला सांगितली होती. यानंतर जे. जे. रुग्णालयातील फिवर क्लिनिकमध्ये डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी करण्यात आली, असंही त्यांनी सांगतलं.
दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी आजवर सर्वांनी चांगली साथ दिली आहे. ती यापुढेही सुरू राहिल, असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला.