नवी दिल्ली | कोरोनाशी लढण्यासाठी खासदारांची 30 टक्के पगार कपात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.
2020-21 या वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली असंही प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे.
कोरोनाशी सामना करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे, असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं.