नवी दिल्ली - कोरोनामुळे भारतावर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक आणीबाणी लागू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती कळतीये. 1 मे दिवशी राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी कोवीड कृती दलाशी चर्चा केली आहे. कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी लागू केली जाऊ शकते. आर्थिक आणीबाणी लागू झाल्यानंतर राज्यांचे आर्थिक अधिकार संपुष्टात येऊन ते अधिकार केंद्राला प्राप्त होतील.
कोरोनानंतरच्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राने सध्या जाहीर केलेले पॅकेज जीडीपीच्या फक्त 1 टक्के आहे. अमेरिकेने जीडीपीच्या 10 टक्के पॅकेज घोषीत केले आहे. कोरोना पॅकेज जीडीपीच्या कमीत कमी तिप्पट करण्यासाठी या आणीबाणीची अंमलबजावणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आणीबाणीत राज्यांच्या कर्माऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय केंद्र शासन घेऊ शकते. त्यामुळे त्यातूनही जवळपास 5 हजार कोटी रूपये वाचवू शकतील, असा मानस केंद्राने ठेवला आहे.