मुंबई | महाराष्टातलं लॉकडाउनला हे कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी प्रत्येकाने अजुनही घरात बसायला हवं, असं आवाहन केलं. कोणत्याही संकटात आपला महाराष्ट्र हा देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवतो, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
केवळ नाईलाजाने किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनची बंधने कठीण करावी लागतील. कोरोनाचे युद्ध आपण जिंकणारच असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून, कोरोना महामारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.
आपण कोरोना संसर्गाचा वेग मंद राखण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र मला ही रुग्णांची संख्या शून्य करायची आहे. आता कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. जगभरात यासाठी प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधानांच्या बैठकीत मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली, असल्याचं ठाकरे म्हणाले.
हे किती दिवस चालणार असं अनेकजण विचारतात, तर मी त्यांना सांगेल की जितकी आपण शिस्त पाळाल तितका तो लवकर संपेल. 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहिलं. त्यादरम्यानच्या काळात काय नियोजन आहे आणि काय करायचं आहे या सुचना देण्यासाठी मी पुन्हा तुमच्याशी बोलणार असल्याचं ठाकरेंनी सांगितलं.