मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. कोरोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 14 एप्रिलनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम असेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
पंतप्रधानांच्या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली. त्यावेळी मी सर्व माहिती देताना शेवटी हेच सांगितलं आहे की देशात लॉकडाऊन वाढो अथवा नाही, पण मी महाराष्ट्रात 14 एप्रिलनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आतापर्यंत आमच्या तोंडावर पट्ट्या बांधण्याची कोणाचीही हिंमत नाही. पण एका विषाणूने ते केलं. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, आपण घरी जाऊन टेस्ट करत आहोत, आतापर्यंत 33 हजार चाचण्या झाल्या, मुंबईत 19 हजार चाचण्यामध्ये 1 हजार कोरोना पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
गाफील राहता येणार नाही. सोमवारी आपल्या राज्यात पहिला रुग्ण सापडून पाच आठवडे होत आहेत, आपण संक्रमित असलेली साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहिलं, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.