कोरोना इफेक्ट- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय...

मुंबई |  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या तसंच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. 30 एप्रिलपर्यंतचं अ‌ॅडव्हान्स बुकिंग रेल्वेने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीव रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 30 एप्रिलपर्यंत रेल्वे धावणार नाहीत.


15 तारखेला केंद्राने जारी केलेला लॉकडाऊन संपणार होता. त्यामुळे रेल्वेने अ‌ॅडव्हान्स बुकिंग सुरू केलं होतं. मात्र गेल्या आठवड्याभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ झाल्याने आता रेल्वेने सावध पाऊल टाकलं आहे.


5


दरम्यान, ज्या प्रवाशांनी अ‌ॅडव्हान्स बुकिंग केलं आहे त्यांना त्यांचे पैसे परत दिले जातील, असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे. 30 एप्रिलपर्यंत कोरोनाच्या रूग्णांची संख्या पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image