लातूर- कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशात संचार बंदी असल्याने रस्त्यावर राहणारे गरीब, विकलांग तसेच शासकीय रुग्णालय येथे आलेले ग्रामीण भागातील रुग्णांना संस्थेच्यावतीने मोफत १०० अन्नाचे पाकीट दररोज सायंकाळी वाटप करण्यात येत आहेत. हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबाना जीवन आवश्यक खाद्य पदार्थ, ५ किलो तांदुळ, ५ किलो गव्हाचे पीठ, १किलो तुरदाळ, हरभरा दाळ व भाजीपाला संस्थेच्या मार्फत २५० गरजुवंत कुटुबांना वाटप करण्यात आले. मा. तहसीलदार साहेब, लातुर यांच्या अहवानाला संस्थेने प्रतिसाद देत परराज्यातील मजुरांसाठी १०० किलो तांदुळ, हरभऱ्याची दाळ व भाजीपाला तहसील कार्यालय, लातुर येथे दिले. जो पर्यंत संचार बंदी असणारं आहे तो पर्यंत संस्थेच्या वयीने अन्नसेवेचे हे कार्य सुरु राहणार आहे.
लातूर शहरातील गरुजुवंतांनी ७०२८४८९४४२ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे अवाहन संस्थेचे सचिव अलीम शेख यांनी केले आहे. संस्थेच्या या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी शेख हबीबसाब, शेख सलीम व सय्यद फय्याज, सय्यद मुशीर, शेख वसीम, शेख ताजुद्दीन हे अथक परिश्रम घेत आहेत.