मुंबई - कोरोनाच्या संकटकाळात मजुरांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. 3 मे पर्यंत देशभरात लॉकडाउन आहे.
12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजारांची मदत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्यातील मजुरांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत.
लॉकडाउनचे सर्वाधिक चटके बसत आहेत ते मजूर वर्गाला. त्यांना काहीसा का होईना आर्थिक दिलासा देता यावा म्हणून हा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
सध्या सगळ्या प्रकारची बांधकामं बंद आहेत. त्यामुळे या मजुरांवर बेकारीचं संकट ओढवलं आहे. अशा परिस्थितीत इतर राज्यांनीही मजुरांना मदत केली आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारनेही मदतीचा हात या सगळ्यांना दिला आहे.