नवी दिल्ली - देशात 24 तासांत कोरोनाचे 693 नवे रुग्ण आढळले आहेत. देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4067 वर पोहोचला आहे. यापैकी 1,445 रुग्ण तबलिगीशी संबंधित आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 76% पुरुष तर 24% महिला आहेत, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.
कोरोनाने आतापर्यंत देशभरातील 109 जणांचा बळी घेतला आहे. कोरोनामुळे काल देशभरात 30 जण दगावले. देशातील 63% कोरोनाबळी 60 पेक्षा अधिक वयाचे, तर 30% मृत 40 ते 60 वर्षे वयोगटातील असून 7% मयत हे 40 पेक्षा कमी वर्ष वयाचे होते, अशी देखील माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय रेल्वेने 13 दिवसांमध्ये 1340 मालवाहू गाड्यांच्या माध्यमातून साखर आणि 358 टँकरच्या माध्यमातून खाद्य तेल देशाच्या विविध कान्याकोपऱ्यात पोहोचवले आहे, अशी माहिती लव अग्रलाल यांनी दिली आहे.
दरम्यान, आतापर्यंत 16.94 लाख मॅट्रिक टन अन्नधान्य देशभरात पाठवण्यात आलं आहे, असं लव अग्रलाल यांनी सांगितलं आहे.