मंबई | महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतानाच दिसत आहे. 18 रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 320 वर पोहोचली आहे.
मुंबईत 16, तर पुण्यात दोन नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 167 वर गेला आहे. ‘कोरोना’मुळे महाराष्ट्रात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 12 वर पोहोचलेला आहे. मुंबई आणि पालघरमध्ये प्रत्येकी एका ‘कोरोनाग्रस्त’ रुग्णाचा मृत्यू झाला.
मुंबईतील हा आठवा बळी आहे. मुंबईत 75 वर्षीय वृद्धाचा ‘कोरोना’मुळे बळी गेल्याची माहिती आहे, तर पालघरमध्येही 50 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्ताचा मृत्यू झाला. मुंबईत 8, तर नवी मुंबई, पुणे, पालघर आणि बुलडाण्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मुंबईतील कालचे आणि आतापर्यंतचे आकडे पाहता काही तासातच 75 रुग्णांची भर पडल्याचं चित्र आहे. मुंबईत आता 167 कोरोनाग्रस्त असून पुण्यात 38 कोरोनाबाधित आहेत.