लातूर, दि.4:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिनांक 3 एप्रिल 2020 रोजी रात्री 20 व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते.ते नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत काल रात्री पाठवण्यात आले. त्यापैकी बारा व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत, तर उर्वरित आठ व्यक्तीचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत. तसेच त्या सर्व रुग्णांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ॲडमिट करण्यात आले असून त्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
20 व्यक्तींच्या स्वॅब नमुन्यांपैकी 12 निगेटिव्ह, तर 8 पॉझिटिव्ह!