पुणे | नवी दिल्लीतील ‘तब्लिग-ए-जमात’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेले 136 जण हे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. तर 47 जण हे औरंगाबाद शहरातील असल्याची समोर आले आहे.
राज्यातील जवळपास 199 जण ही नवी दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ हा धार्मिक कार्यक्रम सहभागी झाल्याचे समोर येत आहे. यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागाचा जीव टांगणीला लागला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सापडलेल्या या 136 जणांचे सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहे. अद्याप यातील कोणत्याही व्यक्तीचा रिपोर्ट आलेला नाही. तसेच यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे.