मुंबई | सर्व देशभरात कोरोनाने आपली दहशत पसरवली आहे आणि आपल्या राज्यात यावरूनही राजकारण तापलं असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला गांभीर्य नसलेला पक्ष म्हटलं होतं. राऊत यांच्या वक्तव्यावर भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
ही राजकारण करण्याची वेळ नाही. विरोधी पक्षावर टीका करणारे संजय राऊत हे कोण आहेत? ते शरद पवार यांच्या घरचे खरूजलेले कुत्रे आहेत. या परिस्थितीत केंद्रातील आणि राज्यातील सरकार सोबत आहे, अशा शब्दात अनिल बोंडेंनी राऊतांवर टीका केली आहे.
प्रमुख विरोधी असलेल्यांनी मात्र मुख्यमंत्री मदतनिधीसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही सवतासुभा केला आहे. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही, अशी टीका राऊतांनी अग्रलेखाच्या माध्यामातून केली होती.
दरम्यान, अनिल बोंडेंनी केलेल्या जहरी टीकेवर राऊत काय बोलतात?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.