मुंबई | वैद्यकीय यंत्रणा जवानांप्रमाणे लढतेय त्यांच्यावर ताण आणू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेला केलं. कोरोनासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. जीवनावश्यक वस्तूंचा साठा देखील आहे. घाबरुन जाऊ नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जनतेला धीर दिला. कृपा करा, गर्दी कमी करा, अनावश्यक प्रवास टाळा आणि वर्क फ्रॉम होम करा, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.हा विषाणू हळूहळू पावलं पुढे टाकत आहे. आपण त्याला थोपवत आहोत. आपल्याकडचे रुग्ण सर्वजण बाहेरुन आलेले आहेत. अनवाश्यक असेल तर घरातून अजिबात बाहेर पडू नका, बस, रेल्वेमधील गर्दी आणखी कमी करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
सरकारकडून ज्या सूचना दिल्या जात आहेत, त्या पाळा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.