मुंबई | कोरोनाला विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. राष्ट्रवादीची समाजिक जबाबदारी ओळखून सरकारला हातभार लागावा म्हणून आम्ही हा निर्ण घेत आहोत, असं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी आता निकाराचा लढा सुरू झाला आहे. सरकार पूर्ण ताकदीने त्यासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये आपलंही योगदान असावं म्हणून सामाजिक संस्था, उद्योगपती, राजकारणी आपापल्या पद्धतीने मदत करत आहे. अशातच राष्ट्रवादीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व आमदार आणि खासदारांचा एक महिनयाचा पगार सहाय्यता निधीला देण्याचं ठरवलं आहे.
संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठाम उभा आहे, अशा शब्दात त्यांनी जनतेला आश्वस्त केलं आहे. दुसरीकडे मंत्री बच्चू कडू यांनीही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. मी माझं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देत आहे असं त्यांनी जाहीर केलं आहे. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. आपला देश आपलं राज्य कोरोना रोगासारख्या संकटाचा सामना करत आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपापले योगदान देणं गरजेचं आहे, असं म्हणत ज्यांना शक्य आहे त्यांनी मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.