मुंबई - आपण सोशल मीडिया सोडणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ट्वीट करत संकेत दिले होते. मात्र त्यांनी प्रेरणादायी महिलांना ओखळत असाल तर #SheInspiresUs हा हॅशटॅग वापरून अर्ज करा. त्यांना मी माझं खात चालवायाल देणार आहे, असं सांगितलं आहे. मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचं राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी कौतूक केलं आहे आणि त्यासोबत एक मागणीही केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आपण #SheInspiresUs बाबत घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. या कल्पनेमुळे देशातील अनेक भगिनींचं कर्तृत्त्व आपल्यापर्यंत पोचेल. अशाचप्रकारे बेरोजगार, शेतकरी व विद्यार्थ्यांबाबतही पुढाकार घेतल्यास त्यांच्याही अडचणी कळतील व त्यातून योग्य मार्ग काढता येईल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केंलं. अनेकांनी तर मोदी सोशल मीडिया वापरणार नसतील तर आम्ही देखील वापरणार नाही.
दरम्यान, आता कोणत्या महिलांची मोदींची सोशल मीडियावरील खाती चालवण्यासाठी वर्णी लागते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.