लातूर - विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषदेचे आयोजन येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात केले आहे. यामध्ये विविध ठिकाणाहून विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. या परिदेचे उद्घाटन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी बोलताना श्री गोजमगुंडे म्हणाले की, लातूरचे वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय हे सर्वच स्तरावर आपले नाव गाजवत आहे. येथील सर्व डॉक्टर उत्तम प्रकारची सेवा उपलब्ध करून देत आहेत. निश्चित आपला नावलौकीक संपूर्ण महाराष्ट्रात गाजवतील अशी आशा व्यक्त केली. नवोदित डॉक्टरांनी भविष्यात रूग्ण सेवा स्विकारत असताना आपल्याही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. लातूरकाराचे भाग्य समजतो मा. अमितभैय्या देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाते असून त्यांच्याच संकल्पनेतून लातूर शहरातील प्रत्येक नागरीकाला हेल्थ इन्श्युरन्स कव्हर दिले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.