लातूर - शहरामध्ये सध्या संचारबंदी सुरू असल्यामुळे अनाथ गरीब व गरजू लोकांना जेवणाची खूप मोठी अडचण भासत आहे कारण सध्या सर्वच बाजार हॉटेल बंद असल्यामुळे व हाताला काम नसल्यामुळे लोकांची खूप दुर्दशा होत आहे,अशी माहिती रुद्र प्रतिष्ठान व दामिनी पथकातील वंगे मॅडम यांच्याकडून मिळाल्यानंतर लातूर कपडा बँकेचे सचिव व रयत प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री.सुनिलकुमार डोपे सर,न्यूज लोकनायकचे पत्रकार अजय घोडके सर यांनी यावर छोटासा उपाय म्हणून आपली सामाजिक बांधिलकी जोपासत प्रिया रेसिडेन्सी,देसाई नगर,लातूर येथील महिला, लातूर कपडा बँक व रयत प्रतिष्ठान महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान करण्याचा संकल्प करण्यात आला.यासाठी महिलांनी एकत्र येऊन आपापल्या घरांमध्ये जेवणाचे डबे तयार केले.प्रत्येक डब्यात सकस व भरपेट आहार महिलांनी स्वतः घरात तयार केला. प्रत्येक महिलांनी जवळपास पंधरा - वीस डब्बे जेवण तयार केले.
या कार्यामध्ये प्रिया रेसिडेन्सीचे अध्यक्ष श्री.अमोल जोशी सर व आर.जी.बी.स्टेप्स मार्केटिंग शॉपचे संचालक श्री.केदार बट्टेवार यांनी कंटेनर,पाऊच विनामुल्य उपलब्ध करून दिले.
तयार केलेले डब्बे रुद्र प्रतिष्ठानची टीम तसेच दामिनी पथकातील वंगे मॅडम,भावे मॅडम यांनी स्वतः प्रिया रेसिडेन्सी येथे येवुन ते अन्नदानाचे साहित्य आपल्या गाडीतून गरजु नागरिकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी उचलली व शासकीय रुग्णालय, तसेच शहरातील विविध भागात फिरून पार ही पाडली.
प्रिया रेसिडेन्सी, लातूर कपडा बँक व रयत प्रतिष्ठान महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब,अनाथ व गरजु नागरिकांसाठी रुद्र प्रतिष्ठान व दामिनी पथक यांच्या मार्फत अन्नदान वाटप.