आज दिनांक 11 मार्च रोजी येरमाळा येथे उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार ,येरमाळा ग्रामपंचायत , येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट व सर्व गावकऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली .या बैठकीमध्ये येरमाळा येथे दरवर्षीप्रमाणे भरणारी येडेश्वरी ची यात्रा आठ एप्रिलपासून सुरू होणार आहे ही यात्रा पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला व यात्रेतील सर्व विधीवत होणारे कार्यक्रमही रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला .
यावेळी येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत व प्रशासन यांनी सर्व भाविक भक्तांना आवाहन केले आहे की येडेश्वरी च्या यात्रेला येणाऱ्या भाविकांनी कृपया या वर्षी यात्रा रद्द झाल्या कारणाने व कोरणा व्हायरसमुळे आपण यात्रेला येऊ नये कारण यात्राही पूर्णपणे रद्द केलेली आहे सर्व भाविकांनी या वर्षी आपल्या घरीच श्री येडेश्वरी देवीची पूजा करून यात्रेला न येता सर्व प्रशासनाला बसला व ग्रामस्थांना ग्रामपंचायतला सहकार्य करावे ही विनंती .