मुंबई | गर्दीचे कार्यक्रम टाळा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. मात्र देशात लॉकडाउन असताना कर्नाटकातील भाजपचे आमदार महंतेश कवतागिमठ यांनी आपल्या मुलीचं थाटात लग्न लावून दिलं.
तीन हजार पाहुण्यांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची विशेष उपस्थिती होती. यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येडियुरप्पा आणि भाजपवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे एका आमदाराच्या मुलीच्या लग्नाला इतर 3000 पाहुण्यांसमवेत हजेरी लावतात. देश मोठ्या संकटाशी सामना करत असताना एका राज्याचा मुख्यमंत्री इतका बेजबाबदार कसा वागू शकतो?. महाराष्ट्र आज उद्धवजींच्या सुरक्षित हातात आहे याचा अभिमान वाटतो, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनाचं संकट टळेपर्यंत लग्न सोहळे आयोजित करून नका, असं आवाहन करणाऱ्या येडियुरप्पा यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.