संपूर्ण जगाला सर्वच बाजूंनी हतबल केलेल्या कोरोनाला निष्प्रभ करण्यासाठी आजच्या घडीला सर्वत्र केवळ त्याच्या संसर्गापासून दूर राहणे हाच एकमेव उपाय असल्याने जगातील सर्वच स्तरातील व्यक्तिंना सध्या दक्षता हा एकमेव उपाय अंगिकारला पाहिजे असे आवाहन सर्वत्र केले जात आहे. आशिया खंडातील स्वतःला बलाढ्य आणि सतत खोडकर म्हणून प्रचलित असलेल्या चिनमध्ये जन्माला आलेल्या कोरोना या विषाणूने आज संपूर्ण जगाला विळखा घातलाय. अष्लाध्य इच्छाशक्तीचा उपासक असलेला चिन हा देश स्वतः जगात सिध्द करण्यासाठी नेहमीच काही ना काही विकृत कृत्य करतोय हे सर्वश्रृत आहे. त्याच्या अशा या खोड्यांचे अनेक वेळा स्वतः चिनला सुध्दा आत्ता पर्यंत मोठ मोठे परिणाम ही भोगावे लागलेले आहेत. आता जगात अशांतता निर्माण करण्याच्या कुकर्मी भावनेतून चिनच्या ओहान भागात कोरोना या विषाणूची उत्पती करवीली गेली. यामागच्या येथील विकृत शक्तींचा विकृती उद्देश जरी असला तरी त्यात ते सफल न होता त्यांच्या निष्काळजी पणामुळे हा विषाणू तेथील मच्छी बाजारातून संक्रमित झाला. गर्दीच्या ठिकाणी संक्रमित झालेला कोरोनाचा हा विषाणू हा हा म्हणता म्हणता चिनशी व्यावसायिक वा अन्य प्रकारचे संबंध असलेल्या शेजारी राष्ट्रांमध्ये त्याच वेगाने फोफावला. आज कोरोनाने आघोरी रुप धारन करुन अक्षरशः जगाला वेठीस धरल्याचे चित्र आज निर्माण झालेले आहे. अशा वेळी संपूर्ण जगाने या विषाणू पासून म्हणजेच थोडक्यात कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करुनच आपला बचाव होऊ शकतो हे सिध्द केलेले आहे. यामुळे भारतीय सनातनी परंपरेतील नमस्ते या समोपचारिक संस्कारी परंपरेचा संपूर्ण जगाने अंगिकार केला. ही बाब विशेष करुन प्रभावी तर ठरतच आहे पण एकमेकांना भेटल्यानंतर हाता हात देऊन अभिवादन करण्याच्या प्रकाराला दूरावा देत लांबूनच आपण आपले अभिवादन समोरच्या व्यक्तिला करण्याची परंपरा अतिशय परिणाम कारक ठरु लागलेली आपणास पहायला मिळत आहे. आता प्रत्यक्षात कोरोना या रोगाबद्दल किंवा त्याचा प्रभाव निर्माण करणार्या विषाणूबद्दल जाणून घ्यायचं झालं तर तज्ज्ञांकडून असं सांगितल जातय की हा विषाणू 400 ते 500 मायक्रो आकाराचा आहे. त्यामुळे याचा संसर्ग टाळण्यासाठी आपण कोणत्याही अगदी साध्यात साध्या मास्कचा सुध्दा वापर करु शकतो. त्याशिवाय या विषाणूंपासून बचाव करण्यासाठी कोणत्याही खर्चीक उपाय योजनांची आवश्यकता पडणार नाही. त्याशिवाय इतर संसर्गजन्य विषाणूंप्रमाणे हलके नसल्यामुळे हवेतून प्रवाहित होऊन त्यांचा संसर्ग होणे अपेक्षीत नसल्याने त्याबाबत लोकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय हा विषाणू वेगवेगळ्या प्रकारच्या संक्रमाणातून कपड्यावर आला तर हा विषाणू केवळ 9 तास जिवंत राहू शकतो. त्यामुळं आपल्याकडं बाहेर देशातून येणार्या लोकांना अगोदर राजस्थानमध्ये नेलं जात आहे जेणे करुन हे आलेले नागरिक येथील वातावरणातील तापमानामुळं निर्जंतूक व्हावेत त्याशिवाय त्यांना या भागातील सरकारने निर्माण केलेल्या अत्याधुनिक वैद्यकिय सेवांच्या माध्यमातून खात्रीपूर्वक निर्जंतूक करण्याचे काम केले जातेय.ंया व्यतिरिक्त नागरिकांच्या हस्तांदोलनातून किंवा अन्य प्रकारातून संक्रमित झालेल्या व्यक्तिंपासून सामान्य व्यक्तींचा बचाव करण्यासाठी संक्रमीत व्यक्तिंनी जेथे जेथे वावर केलाय किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांनी आपले हात लावलेले आहेत अशा भागांना म्हणजे ठिकाणी ठिकाणी उभे केलेले आधार घेण्यासाठीचे स्टॅण्ड, वेगवेगळे हॅण्डल, एटीएम, वाहनांतील हँडेल, स्टेअरींग अशा वस्तू निर्जंतूक करुन घेणे. त्यांच्यावर सॅनेटराईज केमिकल फवारुन त्याचे निर्जंतूकीकरण करने, थंड वा एसीच्या ठिकाणी संक्रमित व्यक्तींना ठेवणे टाळाणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोणी संक्रमित व्यक्ती आपल्या संपर्कात आल्यास त्याच्यापासून स्वतःचा बचाव करत अशा व्यक्तिला कोरोनाच्या प्रादूर्भावापासून वाचवण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी अशा रुग्णाला कोमट पाण्याच्या मिठ टाकून गुळण्या करायला लावने, थंड पदार्थ खाने वर्ज्य करने, 26 ते 27 डिग्रीपेक्षा अधिक तापमानात अशा रुग्णांचा वावर वाढवणे, गर्दीच्या ठिकाणी न जाने, परिसरात स्वच्छता ठेवणे आदी उपाय करने आवश्यक आहेत. भारतीय जीवनशैलीचा उपयोग करुन इतरांशी संपर्क ठेवने, म्हणजे हाता हात देऊन अभिवादन करण्यापेक्षा फक्त दोन्ही हात जोडून नमस्कार करणे स्वतःचे कपडे स्वतःच स्वच्छ करुन ते इतरांच्या संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त संक्रमित व्यक्तींनी कोरोनाच्या विषाणूंचा प्रभाव कमी करण्यासाठी सूर्य नमस्कार करावा, अन्य योगाभ्यासातील श्वसन क्षमता वाढवणारे व्यायाम करणे आवश्यक आहेत. आज जगासह देशात महामारीसारखे उग्र रुप धारण केलेल्या कोरोनाशी चार हात करण्यासाठी भारतीयांनी ही हिंमतीने स्वतः प्रतिबंध करुन इतरांनाही त्याबद्दल सजग करने ही काळाची गरज असल्याने प्रत्येक भारतीयाने आता सर्व मतभेद विसरुन या वैश्विक संकटला सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिक दृष्ट्या सजग होणे गरजेचे आहे. कुठल्याही अफवांना, चुकीच्या गोष्टींना बळी न पडता इतरांनाही त्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. चला तर मग कोरोना गो म्हणण्यापेक्षा कोरोना हटावो देश, विश्व बचावो हा संकल्प करुया...
जय हिंद...