मुंबई | राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईतील मराठा आंदोलक तरुणांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत लवकरच मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेणार आहोत. मात्र मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा संभाजीराजेंनी दिलाय.
मराठा तरूणांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांचं काही बरं वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असं संभाजीराजेंनी ठणकावून सांगितलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. मराठा तरूणांचा आंदोलनाचा 36 वा दिवस आहे. अन्नत्याग केल्याने दोन तरूणांची प्रकृती बिघडली आहे. यावरून संभाजीराजेंनी सरकरला धारेवर धरलं आहे. मला कोणत्याही सरकारला दोष द्यायचा नाही. पण आता या तरुणांना न्याय कुणी द्यायचा? हे सरकार कोण चालवतं, मुख्यमंत्री की अधिकारी? असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी उपस्थित केला. दरम्यान, मराठा समाज शांतीप्रिय आहे. मात्र नोकरी दिली नाहीतर आम्ही रस्त्यांवर, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.