नळेगाव : येथील शिवजागृती महाविद्यालयातील गांधी अध्यासन केंद्र ,आय. सी. एस. एस. आर. मुंबई , गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ मार्च २०२० रोजी 'एकविसाव्या शतकात महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता, या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ठीक १०.३० वाजता नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव मा.डॉ.सर्जेराव शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. संजय वाघमारे हे उपस्थित राहणार आहेत. तर बीजभाषक म्हणून लातूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी मा. सचिन सांगळे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच याप्रसंगी शिवजागृती महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. माधवराव पाटील,श्री स्वामी विवेकानंद बहुद्देशीय विकास मंडळाचे अध्यक्ष मा. बब्रुवान जाधव, सचिव मा. विश्वनाथ सताळकर हेही यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुपार नंतर शोधनिबंध वाचनाचे पहिले आणि दुसरे सत्र संपन्न होणार आहे. या सत्रामध्ये सत्राध्यक्ष म्हणून नांदेड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.अरुण तवर व उस्मानाबादच्या व्यंकटेश महाजन महाविद्यालयातील डॉ. जयश्री कुलकर्णी तर साधन व्यक्ती म्हणून जळगावच्या गांधी रिसर्च फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी तथा प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत मा.भूजंग बोबडे व बेंगलोर येथील कर्नाटक गांधी स्मारक निधीच्या सदस्य मा. डॉ.अबिदा बेगम या मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या समारोप समारंभाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. संजय वाघमारे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत मा.डॉ श्रीराम जाधव आणि औसा येथील कुमारस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. महेश्वर बेटकर हे उपस्थित राहणार आहेत.तसेच याप्रसंगी शिवजागृती महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. माधवराव पाटील, संस्थाध्यक्ष मा. बब्रुवान जाधव, सचिव मा. विश्वनाथ सताळकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाची सांगता गांधीजीचे वैष्णव जन तो .......हे प्रार्थना गीत गाऊन प्रा. राहुलदेव कदम करतील.
तरी या चर्चासत्रात विद्यार्थी, अभ्यासक , प्राध्यापक, संशोधक तसेच नळेगाव व नळेगाव परिसरातील सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन या चर्चासत्राचे समन्वयक डॉ.ओमशिवा लिगाडे, सहसमन्वयक प्रा. अमोल पगार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य व या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजक डॉ. संजय वाघमारे यांनी केले आहे.