लातूर : दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयुर्वेदातून सुदृढ भारत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मागील सदोत्तीस वर्षापासून आफ्रिकेमध्ये वास्तव्य केलेले आयुर्वेदाचे अभ्यासक मा. श्री. नामदेव शास्त्री उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.गायकवाड राष्ट्रीय सेवा योजनेचे लातूर जिल्हा समन्वयक डॉ.संतोष पाटील, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, सौ. गायकवाड जयमाला मॅडम, प्रा.पांचाळ, प्रा.सोनवणे उपस्थित होते .भारताला सुदृढ बनवायचे असेल तर आयुर्वेद हाच एकमेव मंत्र आहे. रोग्याला रोगमुक्त करण्यासाठी आयुर्वेदाचा व्यवस्थितपणे वापर केला पाहिजे.आपल्या प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाकघरातील अनेक वस्तू आयुर्वेदिक असून त्याचा योग्य वापर केल्यास येणारी पिढी ही निरोगी व सुदृढ बनेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष पाटील यांनी केले तर अध्यक्षीय समारोप डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले. आजीबाईचा बटव्यामध्ये अनेक आयुर्वेदिक वस्तू असत त्याचा वापर कुटुंबातील व बाहेरील व्यक्ती साठी करत असत असे उद्गार अध्यक्षीय समारोपात त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विष्णू चांदुरे यांनी केले तर आभार श्री.भरत पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.मनोज आत्राम, श्री.आकनगिरे व सय्यद या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली आयुर्वेद- श्री. नामदेव शास्त्री