मुंबई | देशभरात दररोज कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 500 पर्यंत पोहोचली आहेराज्यात कस्तुरबा रूग्णालयात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. कस्तुरबा रूग्णालयात दाखल असलेल्या एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना काल संध्याकाळपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारतातील अनेक राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहेत.