ग्रामीण भागातील मुलींना आरोग्य व स्वच्छता या दोन्हीचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना शासनामार्फत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्यावेत यासाठी 12 मार्च रोजी महीला व बालकल्याण मंत्री, यशोमती ठाकूर यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले.
युवतीं कडुन देण्यात आलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, ग्रामीण भागात आजही मासिक पाळी विषयी मोकळेपणाने बोलले जात नसल्यामुळे राज्यात ग्रामीण भागातील महिलांच्या व मुलींच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. ऍनेमिया, एच बी, स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाला गाठी इत्यादी यासारखे आजार व समस्या वाढल्या आहेत. यासाठी जिल्हा परिषद शाळेतून सॅनिटरी नॅपकिन पॅड पुरवण्याचे धाडसी पाऊल उचलून राज्यातील ग्रामीण भागातील नाजूक कळ्यांना पुण्याची ऊर्जा प्राप्त करून द्यावी. अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष साक्षणा सलगर यांनी केली आहे निवेदनावर जळगाव राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील व औरंगाबाद युवती अध्यक्षा अश्विनी बांगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.