नवी दिल्ली | सगळ्या जगावर कोरोनाचं आरिष्ट आलंय. जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली आहे. अशातच जर्मनीतल्या हेसे राज्याचे अर्थमंत्री थॉमस शॉफर यांनी कोरोनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होतंय म्हणून आत्महत्या केली आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेची कोरोनाने लागलेली वाट त्यांना सहन झाली नाही. किंबहुना गेल्या काही दिवसांपासून ते यांच प्रश्नावर चिंतित होते. शेवटी दुर्देवीरित्या त्यांनी आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला.
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे, हे पाहून त्यांना खूप त्रास होत होता. शाफर यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर शाफर यांच्या सहकार्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
शाफर हे गेल्या 10 वर्षांपासून वित्तीय सहयोगी होते. ते कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाविरोधात लढण्यासाठी दिवस-रात्र काम करीत होते. शिवाय विविध कंपनी व कामगारांना मदतही करीत होते.