नवी दिल्ली | कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दिल्लीतून एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासांत राजधानीत कोरोनाचा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही. पहिल्या तीन दिवसांत दिल्लीत 16 जणांना कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तुटलेली पाहायला मिळाली. मात्र असं असलं तरी अद्यापही कोरोनाचा संक्रमणाचा धोका कायम आहे.
राजधानी दिल्लीत आतापर्यंत 30 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 20 मार्च ते 22 मार्च या तीन दिवसात 16 रुग्णांची नोंद झाली. यातील 5 रुग्णांची तब्येत बरी झाली असून त्यांना घरी सोडण्यात आलंय. दरम्यान, सध्या सफदरजंग रुग्णालयात 11 रूग्ण दाखल आहेत. लोकनायक रुग्णालयात 6, राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 आणि जीटीबीमध्ये एक रुग्ण दाखल आहे.