मुंबई | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर तो भारतातही वेगाने वाढत आहे. भारतात थैमान घातलेल्या या व्हायरसला थांबविण्यासाठी क्रिकेट जगतातून मोठ्या प्रमाणावर मदत केली जात आहे. यावेळी भारताचा फलंदाज सुरेश रैनाने कोरोनाग्रस्तांसाठी 52 लाखांची मदत केली आहे.
प्रत्येकाने योगदान करा आणि घरातच रहा, असं आवाहनही रैनाने इतरांना केलं आहे. यामध्ये 31 लाख रुपये पंतप्रधान मदत निधी आणि उर्वरित 21 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 50 लाख रुपयांची मदत केला होती. यामध्ये त्याने 25 लाख रुपये पंतप्रधान मदत निधी आणि 25 लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दिले आहेत. आत्तापर्यंत निधी दिलेल्या खेळाडूंमध्ये रैनाने सर्वाधिक रक्कम दिली आहे.
दरम्यान, बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली, पी.व्ही. सिंधू , गौतम गंभीर या खेळाडूंनी या व्हायरसविरुद्धच्या लढाईत आपापल्या परीने योगदान दिलं आहे.