यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान- डॉ. सुभाष कदम.

लातूर :दयानंद कला महाविद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा डॉ. सुभाष कदम यांनी गौरव केला. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळापासूनच त्यांनी इंग्रजाच्या विरोधात लढे उभे केले होते. शालेय जीवनापासून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला होता. त्याशिवाय शालेय जीवनातच ते क्राँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय कमिटीमध्ये कार्य करत होते. त्यामुळे महाराष्ट्रात ते एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाऊ लागले. जेव्हा स्वातंत्र्य मिळाले व भाषावाद प्रांतरचना म्हणून 1956 ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. पुढे चीनने आक्रमण केल्यानंतर नेहरूंच्या समोर संरक्षणमंत्रालयात असे नेतृत्व असावे म्हणून यशवंतराव चव्हाण यांची संरक्षणमंत्री म्हणून नेमणूक केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा सह्याद्री हा हिमायाच्या संरक्षणासाठी जात आहे. मला आर्शीवाद द्या. अशी भावनिक अव्हान त्यांनी केले होते. पुढे परराष्ट् मंत्री, अर्थमंत्री, विरोध पक्षनेता इत्यादी भूमिका त्यांनी पार पाडल्या. त्यांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. भारताचे ते पंतप्रधानही होऊ शकले असते.  पण पूढे दुर्दुवाने त्यांचा मृत्यु झाला. इत्यादी कार्याचा गौरव प्रा.डॉ. सुभाष कदम यांनी व्यक्त केला. या प्रसंगी श्रीमती संगीता लाहोटी यांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.गायकवाड, श्रीमती जयमाला गायकवाड, कनिष्ठ महा‍विद्यालयाचे उपप्राचार्य अनिल माळी, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे,कार्यालयीन अध्यक्षक श्री. नवनाथ भालेराव, श्री.रमेश देशमुख तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. 



Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image