काबुल या अफगाणिस्तानच्या राजधानीत ISIS च्या एका दहशतवाद्याने शीख धर्मस्थळ गुरुद्वारा वर काल केलेल्या हल्ल्यात 25 नागरिकांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. काल झालेला हल्ला हा संपूर्ण तयारीनिशी करण्यात आला होता .हल्ला झाल्यानंतर थोड्याच वेळात आयएसआयएस ने याची जबाबदारी स्वीकारली.
या हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांत काही लहान मुलेही होती. तसेच गुरुद्वाराचे ही मोठे नुकसान झाले ,असे अफगाणिस्थान सरकारने स्पष्ट केले .
तालिबान या आतंकवादी संघटनेने चे घर असलेल्या अफगाणिस्थान मध्ये आयएसआयएस ने हल्ला करणे, याची जागतिक पातळीवर खूप चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्थान-अमेरिका-तालिबान यांचा शांतता करार झाला होता. या पार्श्वभूमीवर झालेला हा हल्ला आता वेगळेच वळण निर्माण करतो आहे .
भारताने या हल्ल्याचा निषेध करीत अफगाणिस्तानला सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले .अफगाणिस्तानमध्ये मागील काही काळापासून सर्व अल्पसंख्याकांवर नेहमीच हल्ले होत आहेत .ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मियांना देशातून पलायन करावे लागले तर हिंदू व शीख धर्मीय गुप्तपणे आपली धार्मिक कार्ये पार पाडतात .अमेरिकेने आपले सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यास सुरुवात करताच आयएसआयएस ने आता शांत झालेल्या तालिबानच्या गडालाच हात घातला आहे.