अहमदनगर | फडणवीस सरकारच्या काळात तयार झालेला लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधानसभेत सादर करून लोकायुक्त कायदा मंजूर करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अण्णा हजारे यांनी या संदर्भात उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.माजी देवेंद्र फडणवीसांनी मी केलेल्या उपोषणावेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. तरी राज्याच्या हिताकरीता लवकरात लवकर लोकायुक्त कायदा करावा, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.
क्लास एक ते चारचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या गैरव्यवहाराचा कोणत्याही नागरिकांना पुरावा मिळाला तर ते पुराव्यांच्या आधाराने केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्तांकडे चौकशीची मागणी करतील. त्यानुसार लोकायुक्त कायदा विधानसभेत मंजूर करण्याची मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.दरम्यान, गेल्या दीड महिन्यांपासून अण्णा हजारे यांनी मौन व्रत पाळलं आहे. जोपर्यंत निर्भयाच्या दोषींना फाशी होत नाही तोपर्यंत मौन पाळणार असल्याचं अण्णांनी सांगितलंय.