दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.लक्ष्मीरमणजी लाहोटी हे शैक्षणिक वर्ष 2006 पासून आजतागायत अध्यक्षपदी विराजमान आहेत. त्यांनी शिक्षण संस्थेचा नावलौकिक प्राप्त करून देण्याकरिता अनेक उपक्रम राबविले आहेत. यातच भारताचे तत्कालीन राष्ट्रपती महामहीम प्रणव मुखर्जी यांनी या संस्थेला भेट देऊन शिक्षण संस्थेचा गौरव केला. शैक्षणिक क्षेत्रात कौशल्याभिमुख उपक्रम राबवून विद्यार्थी हिताय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थीच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील आहेत. अशा शिक्षणाची दिव्य दृष्टी लाभलेल्या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसानिमित्त दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला.
त्यांनी दयानंद शिक्षण संस्थेमध्ये लॉन टेनिस कोर्ट, इनडोर स्टेडियम, पावणे दोन कोटी रुपयांचे क्रिकेट मैदान, मुला मुलींना स्वंतत्र व्यायमशाळा, बी.फार्मसी,डी.फार्मसी, इंटेरियर डिझाईन, बी ए . प्रशासकिय सेवा, बी ए ऍ़निमेशन ,बी ए फॅशन व ड्रेस डिझाइन आशा विविध व्यवसायाभिमुख कोर्सेसची सुरुवात करून एक नवीन दयानंद पॅटर्न निर्माण केला. एवढेच नाही तर पाणी पुर्नवापर करण्याचा प्रकल्प उभा करून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.
त्यांच्या वाढदिवसनिमित्य शैक्षणिक साहित्य, पुष्पगुच्छ व पेढे देऊन दीर्घायुषी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी दयानंद कला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य (कनिष्ठ) अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. शिवाजीराव जवळेकर, डॉ. रमेश पारवे, डॉ. सुनिल साळुंके, डॉ. अंजली जोशी, डॉ. प्रशांत मान्नीकर, डॉ. संतोष पाटील, डॉ. पुष्पलता अग्रवाल, डॉ. गणेश लहाने, डॉ. नितेश स्वामी, डॉ. संदिपान जगदाळे , प्रा. विलास कोमटवाड , प्रा. सुरेश क्षीरसागर ,कार्यालयीन अधीक्षक श्री. नवनाथ भालेराव आदी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.