महात्मा गांधी जगातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व, डॉ. श्रीराम जाधव यांचे प्रतिपादन.

नळेगाव :  येथील  शिवजागृती महाविद्यालयातील गांधी अध्यासन केंद्र, आयसीएसएसआर, मुंबई, गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4 मार्च 2020 रोजी' एकविसाव्या शतकात गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता 'या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय वाघमारे यांची उपस्थिती होती. तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत डॉ. श्रीराम जाधव यांची उपस्थिती होती. याप्रसंगी  बोलताना ते म्हणाले की"म गांधी ही गेल्या 1000  वर्षातील जगातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहे. हे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे .सबंध जगाला गांधी विचारांचे महत्त्व आता पटले आहे. परंतु आपल्या भारतीय समाजाने मात्र खऱ्या अर्थाने म. गांधींच्या विचारांना अजून स्वीकारले नाही.म्हणून आज आपल्या देशासमोर हिंसाचार, भ्रष्टाचार ,व्यसनाधिनता अस्पृश्यता ,जातिभेद, ग्रामीण समाजाचे शोषण ,परदेशी वस्तूंचा होणारा वापर इत्यादी विविध समस्या व प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. या भारतातील विविध प्रश्नांची उत्तरे गांधी विचारतच आहेत. म. गांधीजींची सत्य ,अहिंसाआणि मानवता ही आदर्श मूल्ये पृथ्वीतलावरील कोणत्याही मानवी समाजाला हितकारक ठरणारी आहेत. भारतातील प्रत्येक व्यक्तीने गांधी यांचे विचार आणि तत्त्वज्ञान स्वीकारून समाज सुखी करण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले आद्य कर्तव्य समजावे" याप्रसंगी मंचावर बीजभाषण म्हणून गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव येथील मा.भुजंग बोबडे यांची उपस्थिती होती. त्यांनी आपल्या बीजभाषणातून 'म गांधी यांचे चरित्र, विचार ,कार्य आणि आजच्या मानवी समाजाला त्यांच्या विचारांची असलेली आवश्यकता 'या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले .याप्रसंगी अध्यक्षीय मनोगतातून  डाॅ. संजय वाघमारे यांनी आपल्या  मनोगतातून म. गांधींची विचारप्रणाली आणि आजच्या जगाला या विचारांची असलेली आवश्यकता' या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंचावर श्री स्वामी विवेकानंद बहुद्देशीय विकास मंडळाचे अध्यक्ष मा.बब्रुवानजी जाधव, सचिव मा.विश्वनाथ सताळकर  चर्चासत्राचे समन्वयक  डॉ ओमशिवा लिगाडे  यांचीही  प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डॉ.ओमशिवा लिगाडे  यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. लहू वाघमारे आणि प्रा.संतोष वायगावकर यांनी केले. तर आभार प्रा अमोल पगार यांनी मानले.



Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image