मुंबई | सर्व सरकारी कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळे आदींनी बँकेचे सर्व व्यवहार राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातूनच करावेत, असा निर्णय सरकारने आज घेतला. राज्यातील, तसेच देशातील काही खासगी बँकांमधील घोटाळे उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारनं खबरदारी म्हणून महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे शासकीय निधी राष्ट्रीयकृत बँकांमध्येच ठेवण्यात यावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.
खासगी किंवा सहकारी क्षेत्रातील बँकांमध्ये कोणत्याही सरकारी योजनांचा निधी जमा करण्यासाठी उघडलेली खाती १ एप्रिलपासून बंद करून, केवळ राष्ट्रीय बँकांमध्येत खाती उघडावीत, असं आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, सोयीचं पडावं म्हणून त्यांची बँक खाती खासगी किंवा सहकारी बँकांमध्ये उघडली होती. त्यामुळं सरकारच्या निर्णयानुसार आता ही खाती राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यात यावीत, असं आवाहन सरकारने केलं आहे.