लातूरच्या गुणवत्तेला आणखीन धारदार बनवण्यासाठी, सौ. मनिषा गावडे यांच्या आयबस या कंपनीचे क्रांतीकारी योगदान...

भारतीय महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कतृत्वाच्या जोरावर अनेक यशो शिखरे पादांक्रांत केलेली आहेत. यामध्ये अगदी सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी पासून ते कल्पना चावला असो की, सुनिता विल्यम्स अशा अनेक रणरागीणींनी आपल्या गुणवत्ता आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर समाजातील अनेक व्यवस्थांना उभारी देण्याचे काम केलेले आहे. त्याच प्रमाणे आयबस कार्पोरेशन या उदयोन्मुख कंपनीच्या डायरेक्टर सौ. मनिषा गावडे यांनीही अभिनव उपक्रमातून विद्यमान शैक्षणिक व्यवस्थेच्या चौकटी बाहेरचा विचार करुन भारतीय शिक्षण व्यवस्थेला नव क्षितीज प्रदान केलं आहे.



केवळ दोन मुलांची आई होऊन त्यांच आयुष्य फुलवणं, त्यांना वाढवण आणि त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आपलं आयुष्य झिजवनं एवढाच विचार न करता काही तरी मोठं करण्याचा विचार करणार्‍या महिलाही आपल्याकडं आहेत. समाजाच्या जडनघडणीत मोलाचे योगदान देणार्‍या शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करण्याच धैर्य एक महिला म्हणून सौ. गावडे यांनी दाखवलं आहे. आपल्या शिक्षकी पेशा सांभाळत विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादातून व अनुभवातून त्यांनी त्यांच्यासाठी अधुनिक आणि डिजीटल शिक्षण पध्दती अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी पुणे येथे आपल्या आयबस कार्पोरेशन अंतर्गत ‘एज्युबुक’ या कंपनीची स्थापना केली. आणि त्याची एक शाखा लातूरमध्ये उघडून या माध्यमातून निर्माण केलेल्या अत्याधुनिक डिजीटल अशी ही शिक्षण प्रणाली लातूरकरांसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे.


मागच्या तिन चार दशकांपासून लातूर जिल्ह्याने शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेला उभारी देऊन आपली एक अनोखी ओळख महाराष्ट्रात निर्माण करुन दिलेली आहे. याचमुळे महाराष्ट्रात लातूरला ‘शिक्षण पंढरी’ म्हणून ओळखले जाते. गुणवत्तेच्या आधारावर लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नचा झेंडा अटकेपार नेणार्‍या येथील शिक्षण व्यवस्थेत अनेक रथी महारथींचे योगदान लाभलेले आहे. तसेच लातुरात नव्याने येणार्‍या आयबस कंपनीच्या एज्युबुक या अत्याधुनिक प्रणालीचा मोठा फायदा होणार आहे. लातूरच्या शैक्षणिक वारस्याला पुढे अविरत ठेवण्यासाठी आणि अधुनिकतेची कास धरत विज्ञानाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे या शिक्षण प्रणालीत अणुकरण केलेले आहे. यामुळे लातूरच्या गुणवत्तेला आणखीन धारदार बनवण्यासाठी देशातील शिक्षणाचे माहेर घर म्हणून परिचीत असलेल्या पुण्याच्या सौ. मनिषा गावडे यांच्या आयबस या कंपनीचे क्रांतीकारी योगदान लाभणार आहे.
सौ. गावडे यांनी 2009 पासून भारतीय शिक्षण व्यवस्थेत अध्ययन आणि अध्यापनासाठी इंटरनेटच्या अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब करुन पारदर्शी आणि अतिशय विश्‍वसनिय संकल्पना उपलब्ध करुन दिली आहे. या नव्या अत्याधुनिक शैक्षणिक संकल्पनेचा लातूर सारख्या शिक्षण पॅटर्नला सर्वोच्च दर्जा निर्माण करुन देण्यासाठी सहकार्य लाभणार आहे हे मात्र नक्की. सौ. गावडे या स्वतः प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याने प्रत्यक्षात त्यांना विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणार्‍या शैक्षणिक व्यवस्थेतील संकल्पना अवगत आहेतच. परंतू विद्यमान शैक्षणिक व्यवस्थेतील गुणदोषांची पडताळणी करुन प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त बौध्दिकतेचा उपयोग करुन त्यांच्या बुध्दीला त्याच्या अवडीनुसार अध्ययन व्यवस्था निर्माण करुन देण्याचा त्यांनी त्यांच्या नव्या संकल्पनेतून प्रयत्न केलेला आहे. जसं की आजच्या मोबाईलच्या जमान्यात लहान मुलांपासून सर्वच वयोगटातील व्यक्तींचे मोबाईलबद्दलचे वाढलेले आकर्षण आणि त्यातून निर्माण झालेली मोबाईलची प्राथमिकता लक्षात घेऊन आयबस कार्पोरेशन कंपनीच्या माध्यमातून एक अधुनिक शिक्षण प्रणाली मोबाईल टॅबलेटमध्येच उपलब्ध करुन दिलेली आहे.
विद्यमान शिक्षण प्रणालीमध्ये दोष आहेत असं म्हणण्यापेक्षा या शिक्षणप्रणालीला अबाधित ठेवत विद्यार्थ्यांना ऋची असणार्‍या साधनांच्या माध्यमातून त्यांना अध्ययन आणि अध्यापनाचा गोडी निर्माण करणे हा एज्युबुकच्या शैक्षणिक प्रणालीचा मुख्य उद्देश आहे.  म्हणजे आजच्या विज्ञान युगातील नवनवीन क्लृप्त्यांचा सगळीकडे अतिरेक होतोय तो केवळ त्याच्या मध्ये उपलब्ध असणार्‍या सहज आणि आकलनीय बाबींमुळे. म्हणजे थोडक्यात असं की, अमिताभ बच्चन, सलमान खान वा अशा अन्य अभिनेत्यांनी चित्रीत केलेल्या चित्रपटातील प्रसंग आणि त्याच्यातील गाणे अशा गोष्टी सहजपणे लक्षात राहतात. परंतू त्याच प्रसंगांना किंवा गाण्यांना जर टेक्स्ट स्वरुपात एखाद्या पुस्तकात अंकित करुन दिलं तर त्याला एवढे सहजतेने समजून घेता येणार नाही जेवढी व्हीडीओंच्या माध्यमातून घेता येणार आहे. त्यामुळे मोबाईल टॅबलेटच्या माध्यमातून जर सर्व विद्यार्थ्यांच्या त्यांच्या वर्गातील दैनंदीन अभ्यासक्रमातील धडे चित्रीत करुन दिले तर त्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासात ऋची निर्माण होऊन काही न समजलेल्या बाबी पुन्हा पुन्हा वर्गातील शिकवणीची व्हीडीओ मागे पुढे घेऊन पाहता येतील आणि समजून घेता येतील. वर्गात किंवा शिकवणीत अभ्यासक्रमातील न उलगडलेल्या गोष्टी म्हणजे शंकाचे सहजपणे निरसण केले जाईल हे मात्र नक्की.
आकरावी व बारावी नंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी खुप मोठ्या वाटा उपलब्ध आहेत. परंतू सध्याच्या युगात डॉक्टर आणि इंजिनीअर होण्यासाठी भारत सरकारने अस्तित्वा आणलेल्या निट आणि जेईई सारख्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला आपली गुणवत्ता आता सिध्द करुन देशातील नामांकित मेडीकल कॉलेजमध्ये किंवा ख्यातनाम आयआयटी सारख्या इंजिनीअरींग कॉलेजमधून आपले उज्वल भविष्य घडवता येते. त्यामुळे क्रमीक अध्ययन पध्दतीतून अथक परिश्रम घेऊन सुध्दा अपेक्षेप्रमाणे यश न साध्य झाल्यास अनेक वेळा विद्यार्थ्यांनी आत्महत्ये सारखे मार्ग अवलंबल्याची आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत. याला विद्यार्थी आणि पालकही जबाबदार नसताना विनाकरण पाल्याचा बळी जातोय हे मात्र नक्की.



परंतू यापुढे असे कोणाच्या पाल्याचा नाहक बळी जाऊ नये आणि पालकांच्या खिशालाही झळ पोहचू नये यासाठी आयबसची अस्तित्वात आलेली शिक्षणप्रणाली ही अतिशय प्रभावी ठरेल. शिक्षण क्षेत्रातील बारकावे आणि विद्यार्थ्यांच्या वयानुरुप सरकारच्या शिक्षण व्यवस्थेत उपलब्ध असलेल्या शिक्षण प्रणालित असलेल्या प्रचलित पध्दतीनुसार विद्यार्थ्यांचा वाढलेला, अभ्यास, स्पर्धा आणि गुणवत्ता प्रमाण यांची सांगड घालताना पालकांची होणारी तारांबळ दूर करण्यासाठी केलेल्या या प्रणाली लातुरातही उद्योग भवन परिसरात उपलब्ध झाल्याने लातूरसह परिसरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात सहजता निर्माण होणार असल्याचा विश्‍वास सौ. मनिषा गावडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. त्यांच्या या नव्या डिजीटल शैक्षणिक प्रणालीला भरभरुन यश लाभो हिच अपेक्षा...


शब्दांकन : संगिता जोंधळे (एम.ए.,एम.फिल.,लातूर)



Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image